Posts

भविष्याची साथ - यशची माल गुफातांना

भविष्य भविष्य म्हणजे काही घातक  गोष्ट नाही पण भविष्यत काही चागल्या आणि वाईट गोष्टीचा केवळ आंदज वर्तवला जातो  जर एखाद्याला त्या घटना किंवा अडचणी किंवा संधी यांना सामोरे जाताना आनंदाच्या काही क्षणांना सामोरे जाण्याची भीत वाटत असेल तर त्यांनी भविष्या जाणून घेण्याच्या भानगडीत पडूच नये ही अपेक्षा. कारण ज्यांना वेळेचं गणित जमत, समजत ते वेळेशी खेळतात.  आणि वेळेसोबत दोन दोन हात करतातही काही वेळेला आपली वेळ सावरून घेतात  आणि यशाच्या काठावर बसून विजयाचा आनंद घेत असतात. लोकांना ती व्यक्ति केवळ काठावर बसलेली दिसते पण यशाचं काठ गाठताना मोजलेली किंमत आणि केलेले परिश्रम त्या व्यक्तिलच माहीत असतात.  त्याची कल्पनाच लोक करीत नाहीत. पण एक गोष्ट मात्र खरी आहे जो कष्ट करतो त्याला यशाचं फळं  नाही मिळत केवळ ज्याच्या डोळ्यापुढे आपलं ध्येय असत ती लोक जिकतात आणि जिंकेपर्यंत हार मानत नाहीत. जर हार पतकरवी लागली तर ते केवळ त्यांच्या साठी ते मैलाच दगड असत. आपण कुठे जावून थांबव आणि कुठे वळण घ्यावं ही जाणीव करून घेण म्हणजे आपल भविष्य पाहण आहे. किंवा आपण जे काही ध्य...
narayanpawarmotivation.blogspot.com मी करू शकतो (पुस्तकाचे नाव जगण्याच्या गोष्टी) आपल्यामध्ये काम करण्याची जी एखादी शक्ति असते तिला नेहमी प्रेरणा मिळत राहिली पाहिजे आणि आपणही त्या शक्तीला सकारात्मक ऊर्जा देत राहील पाहिजे. प्रेरणा म्हणजे ती सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळत राहिली तर आपल्याला आयुष्यात  पुढे जाण्यासाठी प्रगती करण्यासाठी मार्ग मिळत जातात, आपल्याला आपले ध्येय नक्की मिळू शकते हा विश्वास आपल्याला मिळत असतो. आयुष्यात कोणालाच कोणतीचं गोष्ट किंवा काहीही सहजासहजी मिळत नाही त्यासाठी परिश्रम हे करावेच लागतात. कोणालाच काही मोफत मिळत नाही हे विश्व सत्य आहे. एखाद्या  व्यक्तिला यश, पद, प्रतिष्ठा, मान  सन्मान, कीर्ती मिळाली तर त्याने केलेल्या मेहेनतीची परिश्रमाची ती कहाणी असते पण त्या परिश्रमची  ती व्यक्ति स्वत: व इतर कोणीही स्तुती करत नाही. त्याच्या नशिबामुळे हे सगळं त्याला प्राप्त झालं आहे अस लोकांकडून म्हटलं जात. त्याला हे सगळं आयत (काहीही कष्ट  न करता मिळणे)  मिळालं आहे असा इतरांचा (समज) दृष्टीकोण असतो. एखाद्या मुलाचं जन्म जर श्रीमंत घरात झालं...