narayanpawarmotivation.blogspot.com मी करू शकतो (पुस्तकाचे नाव जगण्याच्या गोष्टी) आपल्यामध्ये काम करण्याची जी एखादी शक्ति असते तिला नेहमी प्रेरणा मिळत राहिली पाहिजे आणि आपणही त्या शक्तीला सकारात्मक ऊर्जा देत राहील पाहिजे. प्रेरणा म्हणजे ती सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळत राहिली तर आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रगती करण्यासाठी मार्ग मिळत जातात, आपल्याला आपले ध्येय नक्की मिळू शकते हा विश्वास आपल्याला मिळत असतो. आयुष्यात कोणालाच कोणतीचं गोष्ट किंवा काहीही सहजासहजी मिळत नाही त्यासाठी परिश्रम हे करावेच लागतात. कोणालाच काही मोफत मिळत नाही हे विश्व सत्य आहे. एखाद्या व्यक्तिला यश, पद, प्रतिष्ठा, मान सन्मान, कीर्ती मिळाली तर त्याने केलेल्या मेहेनतीची परिश्रमाची ती कहाणी असते पण त्या परिश्रमची ती व्यक्ति स्वत: व इतर कोणीही स्तुती करत नाही. त्याच्या नशिबामुळे हे सगळं त्याला प्राप्त झालं आहे अस लोकांकडून म्हटलं जात. त्याला हे सगळं आयत (काहीही कष्ट न करता मिळणे) मिळालं आहे असा इतरांचा (समज) दृष्टीकोण असतो. एखाद्या मुलाचं जन्म जर श्रीमंत घरात झालं...
Posts
Showing posts from May, 2017