भविष्याची साथ - यशची माल गुफातांना


भविष्य

भविष्य म्हणजे काही घातक  गोष्ट नाही पण भविष्यत काही चागल्या आणि वाईट गोष्टीचा केवळ आंदज वर्तवला जातो  जर एखाद्याला त्या घटना किंवा अडचणी किंवा संधी यांना सामोरे जाताना आनंदाच्या काही क्षणांना सामोरे जाण्याची भीत वाटत असेल तर त्यांनी भविष्या जाणून घेण्याच्या भानगडीत पडूच नये ही अपेक्षा.

कारण ज्यांना वेळेचं गणित जमत, समजत ते वेळेशी खेळतात.  आणि वेळेसोबत दोन दोन हात करतातही काही वेळेला आपली वेळ सावरून घेतात  आणि यशाच्या काठावर बसून विजयाचा आनंद घेत असतात.

लोकांना ती व्यक्ति केवळ काठावर बसलेली दिसते पण यशाचं काठ गाठताना मोजलेली किंमत आणि केलेले परिश्रम त्या व्यक्तिलच माहीत असतात.  त्याची कल्पनाच लोक करीत नाहीत. पण एक गोष्ट मात्र खरी आहे जो कष्ट करतो त्याला यशाचं फळं  नाही मिळत केवळ ज्याच्या डोळ्यापुढे आपलं ध्येय असत ती लोक जिकतात आणि जिंकेपर्यंत हार मानत नाहीत. जर हार पतकरवी लागली तर ते केवळ त्यांच्या साठी ते मैलाच दगड असत. आपण कुठे जावून थांबव आणि कुठे वळण घ्यावं ही जाणीव करून घेण म्हणजे आपल भविष्य पाहण आहे. किंवा आपण जे काही ध्येय समोर ठेवून पुढे जात आहे ते बरोबर आहे का आणि त्यात येणार्‍या संधी आणि जर आपल्याला अगोदर माहीत असतील तर आपण त्यावर मात करू शकतो आणि संधीच सोन आणि अडचणीच संधीत रूपांतर करून आपल्या आयुष्याला योग्य वळण देवून स्वताला सिद्ध करून जगापुढे आपण स्वताला सादर करू शकतो.

जगात काही साधारण माणसं ही आहेत ती केवळ वेळच्या प्रवाहात वाहत असतात ज्यांना बदल नको हवा असतो किंवा ते बदल स्वीकारायला घाबरत असातात. ते वेळेच्या प्रवाहात वाहताना एखादा काठ गाठण्याचा प्रयत्न ही करत नाहीत. तसाच त्यांना कोणताच यश किंवा आपण ज्यापद्धतीने जगत आहोत तीच योग्या आहे असाच त्याच मत आणि समज असतो. आपल्याला ज्या काठावर जायचं आहे तो काठ आपण स्वत: न ठरवता वेळ ठरवील. ते माझ्यासाठी योग्या आहे,  आणि वेळ आपल्याला कुठेही सोडूदे  आणि कोणत्याची परिस्थितीत ते स्वताला अॅडजस्ट करत असतात आणि त्या पद्धतीने जगत असतात. त्यांच्यातल्या एखाद्याने  त्यांच्यापेक्षा काही तरी किंवा जरा जारी वेगळं केल की ते त्याला आपल्या सोबत ओढण खेचत नेतात आणि तू ही आमाच्याला एक आहेस तुला तुझ्या संधीच सोन करता येत असेल किंवा तू करू शकतोस ही पण आम्हाला घेवून तू करू शकत नाहीस आणि आम्हाला सोडून तुला करता येणार नाही आम्ही तुला सोडणार नाही आणि तूला काही नवीन करू देणारही नाही.

भविष्य माहीत असो किंवा नसो पण ज्याच्या मनगटात बळ आहे नवीन काहीतरी करण्याची जिद्द आहे धडपड आहे. ती व्यक्ति वेळेच्या विरूद्ध प्रवाहात पोहण्याच धाडस करते येणार्‍या संकटांना सामोरे जाते. आपल्यातल्याच लोकांचं विरोध स्वीकारते पण जिद्द सोडत नाही. त्यासाठी इतरांच रोष ओढवते त्यांनी निर्माण केलेल्या अडचणी आणि वेळेने (परिस्थितीने ) निर्माण केलेल्या संकतानाही सामोरे जाते धेर्ये आणि संयमाने आपले पाय रोवून संकटांशी दोन हात करून स्वताला सिद्ध करणे म्हणजे यश मिळवणे होय. येणार्‍या संकटांची जी चाहूल आपल्याला मिळते ती व त्यावर मात कशी करायची तो मार्ग शोधणे म्हणजे भविष्य जाणून घेणे हे होय.

भारतीय परंपरेत भविष्य जाणून घेण्याच्या खूप पद्धती आहेत.  तारे, ग्रह,कुंडली, अंक, चेहरा , हात, हस्ताक्षर  अशा एक ना अनेक पद्धती आहेत. पण या सगळ्यात एक गोष्ट महत्वाची आहे ते म्हणजे वेळ ज्याने वेळेला समजलं त्याने आपल भविष्य स्वता: आपल्या हाताने लिहिलं आहे असा म्हटलं पाहिजे.

गोष्ट 
दोन अगरबत्ती च्या पुड्यांची गोष्ट आहे एकाच नाव असत भाग्य  आणि दुसर्‍याच नाव असत भविष्य. दोघांचही जन्म एकाच कंपनीत झालेल असत.  दोंघांकडे आयुष्याच्या 100 कांड्या  असतात. केवळ त्याचा वापर कसं करायचं हे त्यांच्या हातात असत.
दोघांची पॅकिंग सेम डे ला होते आणि दोघांच्या आयुष्याचा प्रवास सुरू होतो. दोघे एकाच दुकानात विक्री साठी ठेवले जातात भाग्य हा शांत  असल्यामुळे मालक त्याला आतमध्ये गोदाममध्ये ठेवतो कारण त्याची पॅकिंग व्यवस्थित असते. दिसायला आकर्षक असते व त्याला कसलीही धूळ लागलेली नसते. तसेच भाग्य हा आपल सगळं आयुष्य वेळेच्या आहारी गेलेला असल्यामुळे आपलं जे काही भविष्यात आहे ते वेळ ठरवेल अश्या विचाराचा असतो.
या उलट भविष्या हा कंपनीतून निघाल्यावर लगेच बाहेर काय चालल आहे हे पाहण्या साठी धडपड चालू करतो टेम्पोमधील प्रवासात च त्याची धडपड चालू असते. तो गाडीत खाली पडतो त्याला धूळ लागते टेम्पोचा मालक त्याचा परत उचलून बॉक्स मध्ये ठेवतो. दुकानात पोहोचतो तर मालक त्याला धूळ लागलेली असल्यामुळे विक्रीसाठी लगेच समोरच्या टेबलावर ठेवतो. आणि त्याची विक्रीची प्रक्रिया सुरू होते.
तर भविष्य हा आपल्या मेहंनातीवर विश्वास ठेवणार स्वता:च ध्येय ठरवलेला आणि त्या दृष्टीने आपल काम करणारा असतो.
काही देवसातच त्याच्या शंभर कांड्या संपल्या जातात व त्याचे आयुष्य संपते त्या कांड्या एका मंदिरातील पुजारीने विकत घेतलेल्या असतात व त्या पुड्याला जरा धूळ लागलेली असते म्हणून दुकानदार त्या पूजरीसाठी त्या पुड्याची किंमत कमी करतो व तो लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्यात त्याला यश मिळते.
दुसरी कडे भाग्य वेळेची वाट पाहत जे काही होईल ते सहन करत त्या कपाटात असतो त्या कंपाटामध्ये झुरळ,  मुंग्या फिरत असत आणि कधी कधी उंदीर ही फिरत असत आणि त्यामुळे खूप महीने तो त्या कपाटामध्ये बंद राहिला मग एक श्रीमंत माणूस येतो आणि सुगंधी अगरबत्ती द्या बोलतो तेव्हा तो दुकानदार भाग्याची निवड करून त्याला तो पुडा देतो. नंतर भाग्य ला समजते की, त्याला विकत घेणारा कोणी पुजारी नव्हता तर एका ठिकाणी हवन चालू होते तिथे त्या अगरबत्ती तो दान म्हणून देणार होता.
सगळ्यांचा शेवट हा गोडच असतो पण आपण किती जगलो या पेक्षा कसे जगलो याला महत्वा आहे. कारण जगताना आनंद दिला आणि घेतला पाहिजे केवळ काही क्षणात राख होण्यापेक्षा आयुष्याची मज्जा घेत रोज थोड थोड जगल पाहिजे.

Comments